
पोर्तुगालमध्ये झालेल्या केटलबेल स्पर्धेत भारताला रौप्य पदक
कोथरुड - केटलबेल या व्यावसायिक क्रीडा स्पर्धेत 74 किलो वजन गटात कोथरुड मधील पराग म्हेत्रे याने रौप्य पदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पोर्तुगालमध्ये झालेल्या वर्ल्ड केटलेबल स्पोर्ट चँम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवणारा पराग हा परिलाच भारतीय खेळाडू आहे. त्याने क्लीन अँड जर्क प्रकारात ३० मिनीटाच्या कालावधीत न थांबता ३२ किलो वजन उचलून व्यावसायिक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. त्यामुळे पराग केटलबेल खेळात जगामध्ये दुस-या क्रमांकावर पोहचला आहे. वर्ल्डस केटलबेल स्पोर्ट्स इंडिया फेडरेशनच्यावतीने पोर्तुगाल मध्ये झालेल्या स्पर्धेसाठी गौरांग आमडेकर, राजराजेश्वरी राजाराम या स्पर्धकांची निवड झाली होती.
केटलबेल हा मुळचा रशियन राष्ट्रीय खेळ असून या खेळाचा आणि त्यामुळे येणा-या फिटनेस बाबत भारतभर प्रचार करण्याचे काम पराग म्हेत्रे करतो. माणसाची सहनशक्ती वाढवणारा, ताकद आजमावणारा हा खेळ आहे. पोर्तुगालमध्ये वर्ल्ड केटलबेल स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये परागने भारतासाठी रौप्य पदक मिळवले आहे. क्लीन अँड जर्क इव्हेंटमध्ये 30 मिनिटे (नॉन स्टॉप) 32 किलो वजन 235 वेळा उचलून त्याने व्यावसायिक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 2 क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. पोलंडने सुवर्ण तर स्पेनने कांस्य पदक पटकावले.
आपल्या यशाबद्दल बोलताना पराग म्हणाला की, मला मार्शल आर्ट येते. इंजिनियर म्हणून 2005 ला अमेरिकेत गेलो होतो त्यावेळेस फिटनेसच्या निमित्ताने माझी या खेळाशी ओळख झाली. कमी जागेत करू शकणा-या या व्यायाम प्रकाराची मला गोडी लागली. भारतातील 20 राज्यात आम्ही हा खेळ पोहचवला. इतर राज्यातही हा खेळ पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. या आंतरराष्ट्रीय खेळासाठी वर्ल्ड केटलबेल स्पोर्ट फेडरेशनने परागची आंतरराष्ट्रीय पंच" म्हणून निवड केली आहे. पंच म्हणून काम करण्याची संधी मिळालेला तो एकमेव भारतीय आहे.
Web Title: India Wins Silver At Kettlebell In Portugal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..