esakal | भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू I JAG Admission
sakal

बोलून बातमी शोधा

JAG Admission

भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय सैन्यदलाच्या वतीने 'जज एडवोकेट जनरल'च्या (जेएजी-28) प्रवेश प्रक्रियेसाठी  ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे. ही प्रवेश प्रक्रिया पुरुष व महिला उमेदवारांसाठी असून विधीची पदवी असणे आवश्यक आहे. येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

यामध्ये रिक्त पदांची संख्या सात असून त्यातील 2 पदे महिलांसाठी तर 5 पदे पुरुषांसाठी आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी 21 ते 27 अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना एलएलबी मध्ये किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तसेच या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीकरिता  joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

loading image
go to top