

Generative AI in business schools
sakal prime deals
Indian Business Schools Introduce Generative AI in Curriculum :
सध्याचा जमाना हा AI चा आहे. AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे असे तंत्रज्ञान आहे जे सर्व क्षेत्रात महत्त्वाचे ठरत आहे. जनरेटिव्ह AI ऑटोमेशन आणि हायस्पीड डेटा-आधारामुळे सर्वच क्षेत्रातील कार्यप्रणालीची रूपरेषा बदलत चालली आहे. जर तुम्ही MBA करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या नव्या तंत्रज्ञानासोबत काम करण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. आजच्या साहित्यीक ज्ञानापेक्षा गती, अंतर्दृष्टी आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने केलेला वापर याला अधिक महत्त्व देतात.
तुमचे शिक्षण अशा दर्जाचे करायला हवे ज्यामुळे तूम्ही लोक आणि पैसा यांचे व्यवस्थापन करू शकता. बुद्धिमान प्रणालींचे समज आणि उपयोग करण्यास सक्षम बनवायला हवे. या विचारावरच भारतातील बिझनेस स्कूल्स त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करत आहेत. कोर्सेसचे पुनर्रचना, वर्गातील अनुभवांचे पुनर्रूपकरण आणि उद्योगजगतातील संबंध अधिक मजबूत करीत आहेत.