
पुणे - राज्यातील सर्व महाविद्यालयात ५० गुणांचा भारतीय संविधान हा सक्तीचा करा अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवीच्या द्वितीय वर्षात भारतीय संविधान हा दोन क्रेडिटचा विषय अनिवार्य केला आहे. त्यामध्ये संविधानाची ओळख, निर्मिती, तरतूदी, सामजिक व राजकीय भान निर्माण करणारा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
प्रयास संस्थेने नोव्हेंबर महिन्यात याबाबत उदय सामंत यांनी भेटून राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात ५० गुणांचा भारतीय संविधान शिकवला जावा अशी मागणी केली आहे. प्रयासचे अध्यक्ष सचिन शिंदे म्हणाले, " संविधानाबद्दल जनजागृती महत्त्वाची आहे, त्याची माहिती मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या आचरणात बदल होईल. त्यासाठी हा महाविद्यालयीन शिक्षणात विषय अनिवार्य करणे आवश्यक आहे, उदय सामंत यांनीही सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.