esakal | Farmers Protest: 'भारत बंद'मध्ये पुण्यात काय सुरू राहणार? काय राहणार बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers_Protest

या बंदमध्ये शहरातील विविध शेतकरी, कामगार संघटनांसह हमाल पंचायत, इतर रिक्षा संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, दलित पॅंथरचा सहभाग राहील.

Farmers Protest: 'भारत बंद'मध्ये पुण्यात काय सुरू राहणार? काय राहणार बंद?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकरीविरोधी कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी मंगळवारी पुण्यातील राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे व्यापारी महासंघाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु दुकाने बंद न ठेवता मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. पीएमपीएलची बससेवा सुरू राहील. तर, रिक्षा, टेम्पो वाहतूक सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत बंद राहील. 

पुणे: कोरोनाची स्थिती नियंत्रणात पण...; काय म्हणाले जिल्हाधिकारी?​

केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. शेतकरी आंदोलनात सुरवातीला पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी सहभागी झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, पश्‍चिम बंगालसह अन्य राज्यातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. मार्केट यार्डमधील भूसार बाजार बंद राहील. परंतु भाजीपाला आणि फळ बाजार सुरू राहील. 

दहशत माजविणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नागरिकांवर करायचे हल्ले​

या बंदमध्ये शहरातील विविध शेतकरी, कामगार संघटनांसह हमाल पंचायत, इतर रिक्षा संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, दलित पॅंथरचा सहभाग राहील. पुणे व्यापारी महासंघाने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यवसाय अडचणीत असल्यामुळे दुकाने बंद न ठेवता केवळ मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले. 

रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी​

शहरात हे बंद राहणार : 

रिक्षा, टेम्पो सकाळी 11 ते 1 या कालावधीत बंद 
मार्केट यार्डमधील भूसार बाजार 
मालवाहतूक (अत्यावश्‍यक वगळता), 
शेतमाल चढ-उतार

हे सुरू राहणार : 

पीएमपी बस वाहतूक 
एसटी बस, रेल्वे वाहतूक 
दूध विक्री, भाजीपाला, फळ बाजार 
औषधी दुकानांसह अत्यावश्‍यक सुविधा 
बॅंका, व्यापारी दुकाने

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)