राज्यघटनेत दुरुस्तीचे अधिकार देशाला पुढे नेण्यास सक्षम

राज्यघटनेत दुरुस्तीचे अधिकार देशाला पुढे नेण्यास सक्षम
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.१५ ः ‘‘गेल्या ७५ वर्षांत सातत्य आणि बदल, अधिकार, उत्तरदायित्व आणि कर्तव्ये यांच्यात समतोल राखणारी भारतीय राज्यघटना एका जिवंत आणि सतत प्रगती करणाऱ्या पुस्तकासारखी आहे. लोकशाहीतील स्थैर्य आणि राष्ट्रीय ऐक्याचा पाया असलेल्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचे संसदेचे अधिकार बदलत्या काळाच्या आवश्यकतांनुसार देशाला पुढे नेण्यास सक्षम करते,’’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी काल केले.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या ‘द व्हॉइस ऑफ जस्टिस : जस्टिस गवई स्पीक्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशनच्या सहकार्याने थॉमसन रॉयटर्सने प्रकाशित केलेले पुस्तक प्रा.डॉ. एस. शिवकुमार यांनी संपादित केले आहे. या पुस्तकात गवई यांच्या भाषणांचे, व्याख्यानांचे आणि विचारांचे संकलन करण्यात आले आहे.
समाजातील प्रत्येक गरीब आणि मागासलेल्या घटकाला समान संधी आणि सन्मान मिळवून देणे गरजेचे आहे. न्या. गवई यांनी नेहमीच गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी त्यांची प्रशंसा केली. कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ, डॉ. एस. शिवकुमार आणि थॉमसन रॉयटर्सचे प्रकाशक गौरी शंकर नटेशन तसेच कायदा क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com