मागणी जास्त असल्याने मासळीचे भाव तेजीत

मागणी जास्त असल्याने 
मासळीचे भाव तेजीत
Published on

मार्केट यार्ड, ता. १७ : देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मासेमारी पूर्णपणे बंद आहे. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ येथून आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे भाव तेजीत आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंडीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
गणेश पेठेतील घाऊक बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीच्या मासळीची सुमारे १५० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकनचे विक्रेते रुपेश परदेशी आणि मटण विक्रेते संघटनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : २२००-२४००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १५००-१६००, लहान : ११००-१२००, भिला : ९००-१०००, हलवा : ९००-१०००, सुरमई १०००-१४००, रावस : ९००-१०००, घोळ : ९००-१०००, करली : ३५०-४००, करंदी (सोललेली) : ४५०-५००, भिंग : ४५०-५००, पाला : १०००-१४००, वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : ३००-४००, कोळंबी : लहान : २५०-३००, मध्यम : ३५०-४५०, मोठी : ५५०-६५०, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : ३५०-४५०, मांदेली : १४०-१८०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ७००-१०००.
खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २५०-३००, नगली : ४००-५००, तांबोशी : ५५०-६००, पालू : २५०-३००, लेपा : ३००-४००, बांगडा : २५०-३००, शेवटे : ३००-३५०, पेडवी : १५०-२००, बेळुंजी : १५०-२००, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १५०-२००, तारली : २००-२५०.
नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२४०, मरळ : ३५०-४५०, शिवडा : २५०-३००, खवली : २५०-३००, आम्ळी : १४०-२००, खेकडे : २५०-४००, चिलापी : ८०-१८०, वाम : ५५०-६५०.
मटण : बोकड : ८००, बोलाई : ८००, खिमा : ८००, कलेजी : ८४०, चिकन : २४०, लेगपीस : २९०, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३४०.
अंडी : गावरान (शेकडा) : ११०० डझन १४०, प्रतिनग : १२. इंग्लिश (शेकडा) : ५७५, डझन : ७८, प्रतिनग : ६.५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com