

Dr.Krishna Gopal highlights India’s history beyond kings and wars
sakal
पुणे : "इंग्रजांच्या कूटनीती धोरणामुळे भारताचा गौरवशाली आणि महत्त्वपूर्ण इतिहास प्रकाशात आणला गेला नाही. आपला इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नसून तो संस्कृती, अर्थकारण, भाषा, दर्शन, साहित्य यांच्याशी संलग्न आहे," असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी व्यक्त केले. इतिहासातील अनेक गोष्टींचे अद्यापही संशोधन झाले नसून, ते विद्यार्थ्यांना शिकविले जात नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.