esakal | Rain Updates : पुण्यामध्ये आजही पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Rain Updates : पुण्यामध्ये आजही पावसाची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. परिसरात सोमवारी (ता.१७) विविध ठिकठिकाणी पाऊस झाला. वाऱ्यांचा ताशी वेग ३० ते ४० किलोमीटर इतका होता. मंगळवारी (ता. १८) देखील शहरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. (meteorological department also forecast rain in Pune on Tuesday 18th May 2021)

हेही वाचा: पुणेकरांची आता ऑक्सिजनची चिंता मिटली; कशी ते पहा

शहरात सोमवारी ३ मिलिमीटर, तर लोहगाव येथे ०.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. रविवारी (ता. १६) रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस सोमवारीही सुरूच होता. दिवसभर शहरासह उपनगरांत जोरदार वारे वाहिले. तसेच राहून राहून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे १२० ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

राज्यात सोमवारी कोकण गोव्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही भागात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील कमाल तापमानात घट झाली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २१) मध्य महाराष्ट्र, कोकण गोवा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात मंगळवारनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.