
पुणे : रेल्वे प्रशासनाने प्रतीक्षा यादीतील तिकिटांचा क्लास बदलण्याच्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार शयनयानचे (स्लिपर) तिकीट आता प्रथम श्रेणी वातानुकूलितमध्ये अपग्रेड केले जाईल. या वर्गात आसन व्यवस्था उपलब्ध असली, तरी त्यांना प्रथम श्रेणीतून प्रवास करता येणार नाही. मात्र, शयनयानचे तिकीट थ्री व टू टियर वातानुकूलितमध्ये अपग्रेड होण्याच्या नियमात कोणताच बदल केलेला नाही.