Indian Railways: रेल्वेगाड्यांचा सुपरफास्ट दर्जा काढला; १८ गाड्यांचा समावेश; एक जानेवारीपासून बदल, व बदल, दर होणार कमी

Indian Railways Superfast Status Removed : मध्य रेल्वेने १८ रेल्वेगाड्यांचा सुपरफास्ट दर्जा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-काझीपेठ एक्स्प्रेसचा समावेश आहे.
Pragati Express is among the 18 trains losing their superfast status from January 2027.

Pragati Express is among the 18 trains losing their superfast status from January 2027.

esakal

Updated on: 

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने १८ रेल्वे गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा काढून त्यांना 'नॉन-सुपरफास्ट'चा (साधारण एक्स्प्रेस) दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस व पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वे बोर्डाच्या निकषांनुसार या गाड्यांचा सरासरी वेग ५५ किलोमीटर प्रतितास यापेक्षा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे.

Loading content, please wait...