

Advanced Rail Protection System Kavach 4.0 Enhances Passenger Safety
Sakal
पुणे: रेल्वे चालकाला आता इंजिनमध्येच सात किलोमीटर दूर असलेला सिग्नल दिसणार आहे. त्यामुळे तो आधीच रेल्वेचा वेग वाढवायचा की कमी करायचा, हा निर्णय घेऊ शकेल. परिणामी रेल्वेच्या गतीवर नियंत्रण ठेवणे व अपघात टाळण्यासाठी याची मदत होईल. रेल्वे प्रवास गतिमान होताना तो अधिक सुरक्षित होण्यासाठी देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ‘कवच’ प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. पुणे विभागात ७००किलोमीटरच्या मार्गांपैकी २५० किमीपेक्षा जास्त अंतरावर ‘नॉन-सिग्नलिंग कवच’ची चाचणी घेण्यात आली असून, ती यशस्वी ठरली आहे.