

Rice Export From India May Slow Down As Shipping Costs Surge To 7500 Dollars And Cargo Container Shortage Hits Exporters
sakal
मार्केट यार्ड : जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाची मागणी कायम असून, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत निर्यात १२.२७ दशलक्ष टनांवर पोचली आहे. मात्र, जुलैपासून कार्गो कंटेनरची कमतरता आणि समुद्री वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने निर्यातीच्या वेगाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी १,५०० ते २,००० डॉलर्स असलेला एका शिपमेंटचा खर्च आता ७,००० ते ७,५०० डॉलर्सवर पोचल्याने निर्यातदारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.