जहाजावर हल्ला, भारतीयाचा मृत्यू

जहाजावर हल्ला, भारतीयाचा मृत्यू
Published on: 

ओमानजवळ हल्ल्यात
भारतीय खलाशाचा मृत्यू

पुन्हा व्यावसायिक जहाज लक्ष्य; १३ जण बचावले

नवी दिल्ली, ता. ३ (पीटीआय) : ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. या जहाजावर १४ भारतीय होते, उर्वरित १३ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले.
ही घटना ओमानच्या लिमाह गावापासून जवळ सोमवारी सायंकाळी घडली. अल-जुसूफी असे हल्ला झालेल्या जहाजाचे नाव आहे. सध्याच्या परिस्थितीवर ओमानमधील भारतीय दूतावास लक्ष ठेऊन आहे. तसेच, बचावलेले भारतीय आणि मृत खलाशाचे पार्थिव मायदेशी पाठविण्यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबर संपर्क साधण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, भारताने या हल्ल्याच निषेध केला असून, या प्रदेशात सातत्याने व्यावसायिक जहाजांवर होत असलेले हल्ले चिंताजनक आहेत. या भागातील तणाव कमी व्हावा आणि या प्रदेशात पुन्हा शांतता व स्थैर्य प्रस्थापित व्हावे, यासाठी सध्याच्या चर्चेतून राजनैतिक तोडगा निघावा, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. ‘व्यावसायिक जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे तातडीने थांबले पाहिजे. आंतरराष्ट्रीय जलमार्गातून मुक्त आणि कोणतीही बाधारित वाहतूक आणि व्यापार तातडीने पूर्वपदावर आली पाहिजे,’ अशी अपेक्षा या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.