

पिंपरी, ता. १४ : मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशनच्या (इंडिया) पाच खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण दहा पदकांची कमाई केली. यात एक सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत १८ देशांतील सुमारे ६८ खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन मलेशियातील मंत्री गोह झीव सेन तसेच जगदीपसिंह डिओ यांच्या हस्ते झाले. भारतासह श्रीलंका, इंग्लंड, सौदी अरेबिया, कॅनडा, कतार, सिंगापूर, बेल्जियम, व्हिएतनाम असे १८ देश सहभागी झाले होते.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रेया दंडे हिने काठीची लढत प्रकारात सुवर्ण, तर काठी फिरवणे प्रकारात कांस्यपदक मिळविले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ऋतुजा कुलकर्णी हिने कुथु वरुसाईमध्ये रौप्य व काठी फिरवण्यात कांस्यपदक पटकावले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात वेदार्थ तापकीर याने काठीची लढत प्रकारात रौप्य व तलवारबाजीमध्ये कांस्यपदक मिळविले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विश्वजीत पवार याने काठीची लढत प्रकारात रौप्य व काठी फिरवण्यात कांस्यपदक मिळविले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात राहुल काळे याने तलवारबाजी व काठी फिरवणे या दोन्ही प्रकारांत कांस्यपदक पटकावले.
आंतरराष्ट्रीय सिलंबम फेडरेशनचे तांत्रिक संचालक रवींद्रन मास्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रन मास्टर, संजय बनसोडे, स्मिता धिवार, डॉ. अजय नवले, गणेश गेजगे, किरण अडगळे तसेच प्रशिक्षक केतन नवले, भूषण यादव, सुदर्शन सूर्यवंशी, रविराज चखाले व अभय नवले यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.