पुणे - ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेने भारतातील पहिल्या ‘एडीएएस टेस्ट सिटी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केली आहे. पुण्यातील तळेगावजवळील टाकवे येथे हा प्रकल्प उभा राहिला असून वाहन क्षेत्रातील उद्योगांना येथे प्रगत चालक सहाय्य प्रणाली अर्थात ‘ॲडास’ (एडीएस) या तंत्रज्ञानाची तपासणी करणे शक्य होणार आहे.