
Nirmala Sitharaman
Sakal
पुणे : ‘‘एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत भारताच्या ‘जीडीपी’मध्ये ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. हा केवळ योगायोग नसून सक्रिय आर्थिक धोरण, धाडसी सुधारणा, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सुधारित प्रशासन याचा परिणाम आहे,’’ असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बँकांची भूमिका अधिकच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.