esakal | मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला भटनागर पुरस्कार जाहीर!
sakal

बोलून बातमी शोधा

India's Nobel Peace Prize Amol Kulkarni was declared the most valuable scientist

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने नुकतेच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार बऱ्याच वर्षांनी मराठी शास्त्रज्ञाला प्राप्त झाला आहे.

मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला भटनागर पुरस्कार जाहीर!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : भारताचे नोबेल समजला जाणारा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार डॉ. अमोल कुलकर्णी या मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला घोषित झाला आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागात कार्यरत डॉ. कुलकर्णी यांच्या आजवरच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार घोषित झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने नुकतेच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार बऱ्याच वर्षांनी मराठी शास्त्रज्ञाला प्राप्त झाला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मागील वर्षीच पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. साईकृष्णन कायराट यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. पाच लाख रुपये रोख आणि 15 हजार रुपये मासिक मानधन असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कुलकर्णी यांचे "चांदीच्या नॅनोवायर'चे उत्पादन करणारे संशोधन विशेष गाजले होते. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले होते.

loading image
go to top