पुण्यात इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन फोडणारे पोलिसांच्या जाळ्यात

Indicash company ATM machine smashed in Pune
Indicash company ATM machine smashed in Pune

लोणी काळभोर (पुणे) : नगर रोडवर सरदवाडी (शिरुर) येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन फोडून, त्यातील ७४ हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिक्रापुर येथील चाकण चौकातून शुक्रवारी (ता. २३) अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

सुनिल रामजी तोरकड (वय- २६ वर्षे), विकास रामजी तोरकड (वय २४ वर्षे, रा. दोघेही बजरंगवाडी शिक्रापूर, मूळ गाव, पारोडा जि हिंगोली) ही त्या दोन आरोपींची नावे असून, एटीएम मशीन फोडीचा गुन्हा बुधवारी (ता. २१) मध्यरात्री घडला होता. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी हद्दीतील नगर रस्त्यावरील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन बुधवारी मध्यरात्री गॅस कटरच्या साह्याने फोडुन, अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधील ७४ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले होते. गुन्हा गंभीर असल्याने, वरील प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांच्या बरोबरच, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागानेही सुरु केला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे व त्यांचे सहकारी शुक्रवारी शिक्रापुर भागात रात्रीची गस्त घालत असतांना, सरदवाडी येथील एटीएम मशीन फोडणारे आरोरी चाकण चौकात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक शिवाजी ननवरे याच्यासह त्यांचे सहकारी फौजदार दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिमन, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, विजय कांचन, राजू मोमिन, चंद्रकांत जाधव, धिरज जाधव व दगडू वीरकर यांनी चाकण चौकात साफळा रचला. यात वरील दोघेही अलगत अडकले. वरील दोन्ही आरोपींना शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे करत आहेत.
 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com