

Indigo Flight Disruptions Force MLAs to Travel by Road to Nagpur
Sakal
पुणे : इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने देशभरातील हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहेच. पण त्यात आता पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही अडकले आहे. रविवारी (ता.७) दुपारच्या विमानाचे तिकीट अनेकांनी काढले आहे. पण विमान रद्द होणार की वेळेवर उडणार यावरून गोंधळ निर्माण झाल्याने अनेक आमदारांनी स्वःच्या मोटारीने थेट नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. ८) नागपूर येथे सुरु होते. त्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ रविवारी नागपूरमध्ये दाखल होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना नागपूरला जाण्यासाठी लोहगाव विमानतळ हे सोईचे आहे.