

IndiGo flight
esakal
पुणे - पुणे विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून अडवून ठेवलेला ‘पार्किंग बे’ सोमवारी मोकळा झाला. ‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. ८) या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच त्या ‘पार्किंग बे’पासून अखेर ते इंडिगोचे विमान दूर करण्यात आले. सोमवारी पुणे विमानतळावरील १० ‘पार्किंग बे’ आता विमानांसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विमानाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.