

International Connectivity Takes a Hit: IndiGo Drops Pune-Bangkok Flight
Sakal
पुणे: ‘इंडिगो’ने यंदाच्या हिवाळी हंगामात विविध कारणास्तव, वेगवेगळ्या सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केली. यात पुणे-बँकॉक विमानसेवेचादेखील समावेश आहे. पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम हा २९ मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामातील पुणे-बँकॉक आणि बँकॉक-पुणे या विमानाचे तिकीट बुकिंग रद्द केले आहे. ‘इंडिगो’ने ही सेवा रद्द करण्याच्या पाठीमागे कोणतेही ठोस कारण दिले नाही. केवळ कामकाजातील बदलामुळे ही सेवा रद्द करीत असल्याचे सांगितले.