पुणे - 'पुण्यातील तळेगाव, चाकण परिसरातील आणि अन्य ठिकाणच्या कंपन्या बाहेर जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औद्योगिक क्षेत्रात दादागिरी आहे असे म्हणत असतील, तर तुम्ही काय करत आहात? औद्योगिक क्षेत्रात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची किंवा त्यांच्या नेत्यांची दादागिरी आहे का? हे जाहीर करावे,' अशी टिका आमदार रोहित पवार यांनी शनिवारी केली.