IndVsPak : पुण्यात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

IndVsPak : पुण्यात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

पुणे - India Vs Pakistan T20 World Cup 2022 : भारताने अखेर गेल्या वर्ल्डकपमधील दुबईतील पराभवाचे उट्टे मेलबर्नमध्ये लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने काढले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. (Pune news in Marathi)

हेही वाचा: फोटोग्राफीचा छंद जोपण्यासाठीच ठाकरेंचा दौरा; शिंदे गटाची पाहणी दौऱ्यावर टीका

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यातच पुण्यातील मध्यवर्ती भागात क्रिकेट चाहत्यांनी जलोष केला. गुडलक चौक आणि एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिस देखील क्रिकेट चाहत्यांसोबत थिरकताना दिसून आले.

दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला. या रोमहर्षक विजयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.