फोटोग्राफीचा छंद जोपासण्यासाठीच ठाकरेंचा दौरा; शिंदे गटाची पाहणी दौऱ्यावर टीका

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Updated on

मुंबई - शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत उद्धव ठाकरे यांनी शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत मी तुमच्यासोबत आहे म्हणत शेतकऱ्यांना धीर दिला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिंदे गटाकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Jaydutt Kshirsagar: 'ते' कधीच शिवसेनेत रमले नाहीत; फक्त तिकीट मिळवण्यासाठी क्षीरसागरांनी...

मंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख नेते उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेला खुलं पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, पत्रास कारण की, उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या बांधावर 2 तासासाठी जाणार आहेत असे समजते. सत्ता गेल्यानंतरचा शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा पहिलाच दौरा.

मातोश्रीबाहेर पडुन आपल्या लक्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगरला (औरंगाबाद) पोहचतील. तिथून पुढे लक्झरी कारने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत फोटोसेशन करतील. हा Event करताना उद्धवजी यांची "लार्जर दॅन लाईफ" प्रतिमा दिसली पाहिजे याची त्यांचे फोटोग्राफर व्यवस्थित काळजी घेतील.

या संपूर्ण दौऱ्यात उद्धवजींसमवेत मातोश्रीवरील उद्धवजींच्या कानात खुसुफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले, शेतकाऱ्यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व "बडवे" सोबत असतील. हे "बडवे " शेतकऱ्यांना उद्धवजींच्या जवळ येण तर सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वतःच महत्व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या हे "बडवेच " उद्धवजींना सांगतील.

केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेल्या या लक्झरीयस दौऱ्यात / Event मध्ये उद्धवजी स्वतःचा छंद जोपासून शेतकऱ्यांचे फोटो काढतील, अशा शब्दात सामंत यांनी टीका केली.

सामंत पुढं म्हणाले की, उद्धव ठाकरे त्या नंतर मुंबईत या फोटोचे प्रदर्शन भरवून सेलिब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील... प्रदर्शन पाहतील.... उद्धवजींची फोटोग्राफी किती चांगली आहे !! याचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील "बडवे " शिवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटों बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील. परंतु आदेश पाळणारे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हृदयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाहीत याची सर्वांना जाणीव आहे.

तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौऱ्याचे हे प्रवासवर्णन करत आहे... आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारी शिवसेना व शिवसैनिक ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे बळीराजाची काळजी घ्यायला वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना समर्थ आहे !! म्हणूनच सांगायला अभिमान वाटतो की

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Shivsena: "अब्दुल सत्तार आमच्या पाया पडायचे पण त्यांना आता मस्ती आलीये"

१) ३ वर्षांपूर्वी आपण जाहीर केलेले नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे ५० हजार रुपये आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.

२) भूविकास बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली.

३) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (४) नुकसान भरपाईसाठी 2 एकर जमिनीची मर्यादा 3 एकर केली आहे.

बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला आहे. बळीराजाची काळजी आम्ही आताही घेतच आहोत आणि भविष्यात देखील घेत राहू.!! कळावे,

एकंदरीतच सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर कडाडून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com