esakal | Video : हापूस आंब्याची आवक घटली, किरकोळ भाव वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Mango

पिंपरी शहरात अक्षय तृतीयेनिमित्त होणारी हापूस आंब्याची आवक जवळपास ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. किरकोळ विक्रीत आंबे महागले आहेत. सुमारे १५ टक्के वाढीव भावाने त्यांची विक्री केली जात आहे. 

अक्षय तृतीयेचा सण साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक समजला जातो. या दिवशी दरवर्षी हापूस आंब्याची मोठी आवक होत असते. मात्र, कोरोनामुळे रत्नागिरी-देवगड सहीत सर्व आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शहरातील आंब्याची आवक जवळपास ७० टक्के इतकी घटली आहे.

Video : हापूस आंब्याची आवक घटली, किरकोळ भाव वाढले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात अक्षय तृतीयेनिमित्त होणारी हापूस आंब्याची आवक जवळपास ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. किरकोळ विक्रीत आंबे महागले आहेत. सुमारे १५ टक्के वाढीव भावाने त्यांची विक्री केली जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्षय तृतीयेचा सण साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक समजला जातो. या दिवशी दरवर्षी हापूस आंब्याची मोठी आवक होत असते. मात्र, कोरोनामुळे रत्नागिरी-देवगड सहीत सर्व आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शहरातील आंब्याची आवक जवळपास ७० टक्के इतकी घटली आहे. 

घाऊक विक्रेते संतोष सोनवणे म्हणाले, "अक्षय तृतीये साठी १९ एप्रिल पर्यंत जेवढी आवक झाली आहे. त्याचाच व्यापार चालू आहे. आंब्यांना ग्राहकांकडून मागणी आहे. मात्र, लॉकडाऊन मुळे लोक बाहेर पडण्याचे टाळत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारात ७० टक्के माल आलेला नाही. माझे दरवर्षी १ हजार ते १५०० पेट्या विकण्याचे उद्दिष्ट असते. परंतु, यावेळेस जेमतेम ३०० पेट्यांची विक्री करावी लागत आहे. आंब्याची आवक कमी असली तरी घाऊक बाजारात त्याची किंमत स्थिर आहे."

भोसरी येथील आंबा व्यापारी मारूती बिरादार म्हणाले, "रत्नागिरी, कर्नाटक आंब्याची थोडी आवक झाली आहे. यंदाच्या वेळेस आंब्याची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे, कमी आवक व चांगली मागणी असूनही घाऊक बाजारात आंब्याचे भाव स्थिर आहेत."

रत्नागिरी-देवगड आंब्याचे त्यांच्या प्रतवारी व आकारानुसार भाव निश्चित करून त्याची विक्री केली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेले रत्नागिरी-देवगड हापूस आंबे ५०० ते ९०० रूपये प्रति डझन, बेंगलुरु हापूस आंबे १५० ते ७०० रूपये प्रति किलोने घाऊक बाजारात विक्री होत आहे. तर ४ ते ९ डझनाच्या पेटीची ३ हजार ते साडेपाच हजार रूपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहे. कर्नाटक हापूस ९०० ते १२०० रूपये (४ ते ५ डझन) तर पायरी आंबे १ हजार ते १३०० रूपये (४ डझन) या किंमतीत घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घाऊक बाजारात किंमती स्थिर असल्या तरी किरकोळ बाजारात १५ टक्के भाववाढ झाली आहे.

loading image
go to top