
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दररोज वाढत आहे. असे असताना रस्त्यावर फिरताना किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेकजण मास्क घालत नसल्याचे दिसत आहे.
पुणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क न घालता फिरणारे व कोरोना विषयक खबरदारीबाबच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा जोर वाढविण्यात येणार आहे. याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी दिली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दररोज वाढत आहे. असे असताना रस्त्यावर फिरताना किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेकजण मास्क घालत नसल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच सामाजिक अंतराच्या नियमांकडे तर सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मास्क विषयीची कारवारई आणखी कठोर केली जाणार आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सध्या पोलिसांकडून काही ठराविक चौकातच मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे. प्रवासी कारमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्यावर कारवाई करून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. मात्र ही कारवाई ठराविक वेळ व काही ठिकाणीच होत आहे. आता मात्र शहरात मोठ्या प्रमाणात मास्कची कारवाई केली जाणार आहे.
''शहरात कोरोनाच्या रुग्णाचा आकडा वाढत असल्याचे पाहून सर्व पोलिसांना मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्क घालावे, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करावे.''
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त
हे वाचा - सावधान! पुणेकरांनो कोरोना वाढतोय बरं का, काळजी घ्या