ऑनलाइन शिक्षण काठावर पास; आयआयटीच्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती

Online-Education
Online-Education

पुणे - लॉकडाउनच्या काळात देशभरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यास सुरवात केली. परंतु तांत्रिक अडचणींबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाचा अभाव, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि प्रयोगशिलतेचा अभाव आदी मर्यादांमुळे ही पद्धत काठावर पास झाली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयआयटीच्या 40 संशोधकांचा ऑनलाईन शिक्षणावरील हा अहवाल "आर्काईव्ह' या प्रिप्रींट जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तब्बल 70 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले असून, फक्त 18 टक्के प्राध्यापकांना ऑनलाईन शिक्षण भविष्यात महत्त्वपूर्ण ठरेल असे वाटत आहे. स्वयंअध्ययन, शिकण्यासाठी वेळेचे आणि जागेचे स्वातंत्र्य, असे काही फायदे जरी असले. तरी ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा, इंटरनेट, मोबाईल, संगणक, डेटा स्पीड यांचा अभाव, तसेच गृहपाठ, प्रयोगशाळा, प्रकल्प आणि वर्गातील वातावरणाची अनुपलब्धता यामुळे ऑनलाइन शिक्षण फक्त "प्रयोगा'पुरतेच मर्यादित राहणार असून दीर्घकाळ ते वर्गातील फळ्याची जागा घेईल असे तरी सध्या दिसत नाही. 

पुणे जिल्ह्यातील 'या' गावात कोरोनाचा शिरकाव

सर्वेक्षणाचे निष्कर्ष -
- ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही प्रशिक्षण आवश्‍यक. 
- सुमारे 65 टक्के ऑनलाईन वर्गात 50 पेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित. 
- एका तासासाठी 2 जीबी डेटा आणि 5 एमबी प्रति सेकंद डेटाची आवश्‍यकता. 
- विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण शक्‍य होत नाही. 
- सुमारे 46 टक्के विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करत नाही. 
- ऑनलाईनबरोबरच प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी आवश्‍यक. 

शरद पवार यांच्याकडे तोलाईबाबत करण्यात आली 'ही' महत्त्वाची मागणी

शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे -
- विद्यार्थ्यांशी थेट संवाद वाढवा 
- आवश्‍यक तेवढे ऑनलाईन शिकवा, उरलेले साहित्य उपलब्ध करून द्या 
- शिकविताना पीपीटी, डेमो, व्हिडिओ दाखवा 

अशी असावी ऑनलाईनची पॉलिसी -
- प्रत्येक विषयाचे ऑनलाईनसाठीचे साहित्य विकसित करावे 
- शिक्षकाला त्याच्या सोईनुसार वर्गाची वेळ निश्‍चित करता यावी 
- प्रत्येक विषयाची शिकवणी ऑनलाईन बरोबरच वर्गातही उपलब्ध करावा लागेल 
- ऑनलाईन परीक्षेसाठी मुलाखत, क्वीझ, ओपन बुक टेस्ट, प्रेझेंटेशन यांचा वापर करावा 

1) ऑनलाईन शिकविण्याचा प्राध्यापकांचा अनुभव -
- असमाधानकारक - 74 टक्के 
- समाधानकारक - 26 टक्के 

2) विद्यार्थ्यांचा वर्गाच्या तुलनेत ऑनलाईन तासातील सहभाग -
- असमाधानकारक - 56 टक्के 
- सारखाच - 28 टक्के 
- उत्तम - 8 टक्के 
- तटस्थ - 8 टक्के 

3) परिक्षेबद्दल विद्यार्थ्यांचे मत -
- घेऊच नये - 61 टक्के 
- ओपन बुक परीक्षा घ्यावी - 41 टक्के 
- तोंडी घ्यावी - 17 टक्के 
- ऑनलाईन परिक्षा घ्यावी - 11 टक्के

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com