आता घरबसल्या करा वारसनोंदी

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालककर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे, अशा सहा प्रकारच्या नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. घरबसल्या या नोंदी करणे शक्‍य झाले आहे. कारण, महसूल विभागाने त्यासाठी ई हक्क प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महसूल विभागाकडून यापूर्वीच डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उपलब्ध करून दिला आहे. महसूल विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शासनाने वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदीसाठी ई हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

काय आहे ही प्रणाली?
एकाखी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी यापूर्वी तलाठी कार्यालयात जावे लागत होते. आता नागरिकांना महाभुमी या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाइन अर्ज केला, तरी हे काम होणार आहे. तुम्ही केलेला ऑनलाइन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे. आतापर्यंत एक हजार २०० नागरिकांनी त्याचा फायदा घेतला आहे.

बॅंकांनाही होणार फायदा
शेतकरी अनेकदा शेतीपीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बॅंकांकडून कर्ज घेतात. त्यासाठी घर अथवा जमिनी गहाण ठेवतात. कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे अथवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बॅंका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. तो आता या सुविधेमुळे कमी होणार आहे ‘इ- हक्क’ ही प्रणाली महसूल विभागाने बॅंकांनादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे. 

वारसनोंद, बॅंकांचा बोजा चढविणे अथवा उतरविणे यांसारख्या गोष्टींसाठी नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच ही कामे घरबसल्या मार्गी लागावीत, यासाठी महसूल विभागाने ई हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा.
- नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार, कूळ कायदा शाखा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com