
पुणे : कोरोनाच्या सावटाखाली सुररू झालेल्या गणेशोत्सवात यंदा शहर व परिसरातील बहुसंख्य गृहरचना सोसायट्यांनी सदस्यांकडून वर्गणी न घेता उत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रमही बहुतेक सोसायट्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे सदस्यांना दिलासा मिळाला आहे अन कार्यक्रम रद्द झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन झाले आहे.
गणेशोत्सवाता सोसायट्यांमध्ये दरवर्षी धामधूम असते. सोसायटीचा गणपती म्हणून मंडप घालून आरास केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ढोल-ताशाची पथके बोलविली जातात. त्यामुळे दहा दिवस सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक वातावरण निर्माण होते. कोरानामुळे यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहे. अनेक सोसायट्यांनी वर्गणीच काढली नाही तर, काही सोसायट्यांनी ऐच्छिक वर्गणीवर भर दिला आहे. अनेक सोसायट्यांनी सोसायटीच्या ऑफिसमध्ये किंवा क्लबहाऊसमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून साधेपणावर भर दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या बाबत पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले, "गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा करू, असे आवाहन महासंघाने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 90 टक्के सोसायट्यांनी सदस्यांकडून वर्गणी गोळा केलेली नाही. तसेच काही सोसायट्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव यंदा रद्द केला आहे. एका अर्थाने उत्सवाचे हे विधायक वळण आहे, असेच म्हणावे लागेल.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महासंघाच्या औंध, पाषाण आणि बाणेर भागातील अध्यक्षा आणि 'नियोशी पार्क -4' सोसायटीच्या अध्यक्षा प्रिती शिरोडे म्हणाल्या, "आमच्या भागातील सुमारे 150 सोसायट्यांना आम्ही पत्र पाठवून हा उत्सव साधेपणाने साजरा करावे, असे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सोसायट्यांनी मंडप न घालता सोसायटीच्या ऑफिसमध्येच मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तसेच वर्गणीही गोळा केली नाही. काही सोसायट्यांनी त्यांच्याकडील मूर्तीची फक्त पुजा केली.''
धनकवडीतील परिसरातील पंचवटी सोसायटीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष उदय जगताप यांनीही, त्यांच्या सोसायटीने यंदा घरोघरी वर्गणी गोळा केली नसल्याचे सांगितले. क्लब हाऊसमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून प्रसाद वाटप कोणाला करायचे असेल तर, त्यासाठी आवाहन केले असल्याचे सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महापालिकेने केलेल्या सूचनांनुसारच मूर्तीचा आकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कात्रजमधील लेकटाऊन सोसायटीत वर्षभरात सण, समारंभ आणि उत्सवास साजरे करण्यासाठी एरवी दरवर्षी प्रतिफ्लॅट 500 रुपये गोळा केले जातात. यंदा ही रक्कम 200 रुपये करण्यात आली आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष आणि नगरसेवक बाळा ओसवाल यांनी माहिती दिली.उत्सव साधेपणाने साजरा करतानाच, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.