इंदापुरात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात आला 'हा' अनोखा उपक्रम

डॉ. संदेश शहा
Wednesday, 2 September 2020

 इंदापूर शहरात वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपदादा गारटकर मित्रमंडळाच्या वतीने दहा ठिकाणी मोफत वाफ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरात वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपदादा गारटकर मित्रमंडळाच्या वतीने दहा ठिकाणी मोफत वाफ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

गारटकर यांनी केलेल्या आवाहनानुसार इंदापूर कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, पोलिस ठाणे, खडकपुरा शिवाजी चौक, शास्त्री चौक, साठेनगर, पोरापोरांची चावडी,
टेंभुर्णी नाका, नरसिंह मंडळ, शास्त्री चौक, सरस्वतीनगर येथील कै. अजय ढवळे मित्र मंडळ येथे वाफ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्राचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, डॉ. नामदेव गार्डे, डॉ. संजय हेगड़े, डॉ. विनोद राजापूरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, माज़ी नगराध्यक्ष  विठ्ठल ननवरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक गजानन गवळी, अमर गाड़े, स्वप्निल राऊत, दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

हे वाचा - शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य

यावेळी किसनराव खाडे, श्रीनिवास घोलप यांनी सर्वप्रथम वाफेचा लाभ घेतला. यावेळी विठ्ठल ननवरे म्हणाले, कोरोना महामारीचे संकट शहर व तालुक्यात वाढत चालले असून त्यावर मात करण्यासाठी सर्वत्र वाफ केंद्र सुरू करण्यात येत आहे.त्यानुसार शहरात 10 ठिकाणी वाफ केंद्र सुरू झाली असून तालुक्यात 100 केंद्र सुरू करण्याचा गारटकर यांचा संकल्प आहे. हा संकल्पास तडीस नेले जाईल. इंदापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, रोटरी क्लबचे माज़ी अध्यक्ष राकेश गानबोटे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप वाघमारे, पिंटू मेहता, शंकर वाघमारे, धीरज वाघमारे, वसीम बागवान उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiatives were taken to prevent corona in Indapur