esakal | शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य 
sakal

बोलून बातमी शोधा

Rear view of Quiet Belbaug Chowk and Relax pune police on Anant Chaturdashi

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या. गेले १० दिवस अगदी साधेपणाने उत्सव साजरा केला. शेवटचे दोन तीन दिवस भाविकांची काहीशी गर्दी सोडली तर बहुतांश पुणेकरांनी घरात बसणे पसंत केले. त्याचाच अनुभव आज अनंत चतुर्दशीला आला.

शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य 

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : मानाचे गणपती बेलबाग चौकात पुढे गेल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात प्रंचड गर्दी, मिरवणूक सुरू करण्यासाठी सुरू असलेली मंडळांची धडपड, पोलिसांशी हुज्जत, भाविकांची होणारी गर्दी अन जल्लोष हे ठरलेेले आहेत. मात्र, यंदाचे वर्ष यास अपवाद ठरले आहे. आज रात्री आठच्या सुमारास हा सर्व परिसर सामसूम होता, महत्त्वाच्या गणपतींचे विसर्जन झाल्याने पोलिसही निवांत बसून गप्पा मारत असल्याते दुर्मिळ दृष्य आज अनुभवण्यास आले. 
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या. गेले १० दिवस अगदी साधेपणाने उत्सव साजरा केला. शेवटचे दोन तीन दिवस भाविकांची काहीशी गर्दी सोडली तर बहुतांश पुणेकरांनी घरात बसणे पसंत केले. त्याचाच अनुभव आज अनंत चतुर्दशीला आला. 

मिरवणूकीवर बंदी असल्यामुळे मंडळांनी मांडवातच प्रतिकात्मक कुंडात विसर्जन केले. सायंकाळी दगडूशेठ गणपतीचे विसर्जन असल्याने गर्दी होईल या शक्यतेमुळे पोलिसांनी शिवजी रस्ता बंद केला, बेलबाग चौक, मंडई, बुधवार चौक, आप्पा बळवंत चौकात बॅरिगेट लावून बंद केले. मंदिराच्या दिशेने चालत जाण्यावरही बंदी घातली होती. त्यामुळे या परिसरात सर्वत्र पोलिस आणि मोजके कार्यकर्तेच दिसत होते.

मोरया मोरयाच्या जयघोषात दगडूशेठ, मंडई गणपतीचे साधेपणाने विसर्जन 

सायंकाळी सव्वासात पर्यंत सर्वच प्रमुख मंडळांनी 'श्रींचे विसर्जन केले. त्यानंतर मंदिर परिसरातील कार्यकर्ते, महिला फोटोग्राफी करण्यात मग्न झाले होते. काही वेळानंतर  हा सर्व परिसर शांत झाला. 

दरवर्षी अनंत चतुर्दशीला बुधवार चौक, बेलबाग चौक, परिसरात प्रंचड गर्दी झालेली असते. चेंगराचेंगरीची स्थितीही निर्माण होत. अशा वेळी बेलबाग चौक रिकामा ठेवण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असते. काही वेळेस काठीने सौम्य प्रसादही द्यावा लागतो. रात्री जिलब्या गणपती  बाबू गेनू, भाऊसाहेब रंगारी, मंडई गणपती व त्यानंतर दगडूशेठ गणपती या चौकातून मार्गस्थ होई पर्यंत प्रंचड कमी होत नाही. यंदा मात्र संध्याकाळी आठ वाजता कुठेही वादन नाही, ढकला ढकली नाही,  हुज्जत नाही, मोबाईल चोरीच्या घटना नाहीत. वरिष्ठांकडून पुढे काय करायचे याच्या आर्डर नसल्याने बेलबाग चौक, बुधवार चौकात पोलिस मस्त गप्पा मारत उभे होते. यापुढे असे दृष्य कधी दिसणार नाही, असेही पोलिस सांगत होते.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

loading image