esakal | म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर (Mucormycosis Patient) उपचार (Treatment) करण्यासाठी पुणे विभागासाठी (Pune Department) पाच हजार ‘ॲम्फोटेरेसिन बी’ इंजेक्शन (Injection) उपलब्ध झाली आहेत. तर, पुढील आठवड्यात आणखी दोन हजार इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. (Injections Available for the Treatment of Mucormycosis Patient)

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ॲम्फोटेरेसिन बी’ इंजेक्शनची कमतरता भासत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाइफ सायन्सेस या कंपनीने ५० हजार ‘ॲम्फोटेरेसिन बी’ इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: खूशखबर! शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

पुणे विभागासाठी कंपनीकडून गुरुवारी पाच हजार ‘ॲम्फोटेरेसिन बी’ इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जेनेटीक लाइफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी पाच हजार इंजेक्शन सुपूर्द केली. येत्या आठवड्यात पुणे विभागासाठी आणखी दोन हजार इंजेक्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.