A crowd of relatives of the injured has gathered at the sub-district hospital.
sakal
मंचर - मंचर ते भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटात बुधवारी (ता. २८) प्रवासी इको गाडी सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या चार जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.