
पुणे : ‘शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करताना पुनरावृत्ती टाळता यायला हवी. एक राग किती वेळ सादर करायचा, याचे प्रमाण ठरवले पाहिजे. रूढ रचना आपल्या पद्धतीने सादर करणे महत्त्वाचे आहेच; मात्र संगीतात त्यापेक्षा नवनिर्मितीला सर्वाधिक महत्त्व आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी मंगळवारी व्यक्त केले.