esakal | वेश्यांसाठीच्या अनुदानातील गैरव्यवहाराची होणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

वेश्यांसाठीच्या अनुदानातील गैरव्यवहाराची होणार चौकशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - वेश्याव्यवसाय (Prostitution) न करणाऱ्या महिलांची (Women) नावे (Name) सरकारी अनुदानाच्या यादीत (Government Subsidy List) समाविष्ट करून, काही व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनी फसवणूक (Fraud) केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी (Complaint) प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी (Inquiry) करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. संबंधित महिलांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी आहे. (Inquiry into the Misappropriation of Grants for Prostitutes)

कोरोना कालावधीत वेश्याव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना, मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक साहाय्य करण्यात आले होते. या योजनेंतर्गत ज्या महिला वेश्याव्यवसाय करीत नाहीत, अशा महिलांना चुकीची माहिती देऊन अनुदानासाठी पात्र म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या बदल्यात काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी निम्मी रक्कम कमिशन म्हणून नियमबाह्य पद्धतीने घेतली आहे. अशा व्यक्ती व संस्थांनी महिला आणि सरकारची फसवणूक केली आहे.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच

काही महिलांनी त्यांच्या जबाबात अनुदान परत जमा करण्यासोबतच लाभार्थ्यांच्या यादीतून नाव कमी करण्यात यावे. तसेच, दोषींविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात पुराव्याच्या कागदपत्रांसह तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रारीसाठी संपर्क :

हवेली तहसील कार्यालय - व्यंकटेश चिरमुल्ला, (मंडल अधिकारी, हडपसर), ९८२३३९८७१२

पुणे शहर नायब तहसीलदार - प्रकाश व्हटकर ९४२३३३९१९२

तलाठी, हडपसर - राजेश दिवटे, ९१६८२३२५१९