...तर दुकानदारांचा परवाना होणार रद्द

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील ओंकार कृषी सेवा केंद्रामध्ये युरीया खत शिल्लक असुन सुद्धा शेतकऱ्यांना विक्रीस नकार देत असून शेतकऱ्यांना 320 रूपये दराने विक्री करत असल्याची तक्रार माजी सरपंच अजित गावडे, शेतकरी संतोष गावडे, विलास भाकरे यांनी दिली होती. त्यानूसार कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी दुकानाची चौकशी केली. ​

टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषी केंद्रामध्ये युरीया खते शिल्लक असून विक्री करण्यास दुकानदार नकार देत आहेत. त्याच बरोबर चढ्या भावाने विक्री करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे या भागातील कृषी केंद्राची तपासणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे व 266 रूपया पेक्षा अधिक भावाने केलेली आढळल्यास त्या दुकानदाराचा परवाना रद्द करणार असे शिरूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी सांगितले. खरीप हंगामासाठी युरीया खताची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी मूग व बाजरी पिकाला पहिला खताची मात्रा देण्यासाठी युरीया खताची आवश्यकता असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी मागणी करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील ओंकार कृषी सेवा केंद्रामध्ये युरीया खत शिल्लक असुन सुद्धा शेतकऱ्यांना विक्रीस नकार देत असून शेतकऱ्यांना 320 रूपये दराने विक्री करत असल्याची तक्रार माजी सरपंच अजित गावडे, शेतकरी संतोष गावडे, विलास भाकरे यांनी दिली होती. त्यानूसार कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी दुकानाची चौकशी केली. चौकशी दरम्यान संबधीत दुकानदाराला 14 टन युरीया खत आले होते. त्यातून 64 युरीयाच्या बॅगा शिल्लक होत्या. इतर खते 20 टन शिल्लक होती. खतांचा साठा नोंदवही जुळत नव्हती. साठा भाव फलक लिहलेला नव्हता. खरेदी चलन व बिल दाखविले नाही. दरमहिन्याला पंचायत समितीला खरेदी विक्री केल्याचा अहवाल देणे गरजेचे होते. ते दिले गेले नाही. विक्री केलेल्या खताच्या विक्रीच्या पावतीचा ताळमेळ नव्हता. यामुळे आहे त्या खतावर विक्रीबंद आदेश जारी करण्यात आला. संबधीत दुकानावर परवाना रद्द साठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे यांच्याकडे पाठविण्यात येईल असे बुधवंत यांनी सांगितले.   

समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करु - अजित पवार

''टाकळी हाजी जिल्हा परीषद गटात शेतकऱ्यांची पिळवणूक करून चढ्या भावाने कृषी केंदानी युरीया विकू नये. असे आढळून आल्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार करून परवाने रद्द करण्यात येईल.'', असे जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of agricultural center started in Shirur taluka