समाजकार्याचा वसा घेत होणार आयपीएस

सुर्यकांता मेश्राम
गुरुवार, 14 मार्च 2019

रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे.

रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे.

‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे माझा जीवन प्रवास सुरू आहे. त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न असून, त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. फिल्ड वर्क व सामाजिक कार्याची आवड असल्याने मंत्रालयातील अवर सचिव ही सुपर पे स्केल व चांगल्या प्रमोशनची संधी असलेले पद नाकारून मी सहायक निबंधक पद स्वीकारून काम करत आहे.

वडील प्राध्यापक असल्याने घरातील वातावरण शैक्षणिक होते. यामुळे रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. जोडीला परमेश्‍वर कृपा व आई-वडिलांचा आशीर्वाद होताच. सध्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात सहायक निबंधक पदावर कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे.

मी एमए गोल्ड मेडालिस्ट असून यांनी सहकार व्यवस्थापनातील उच्च पदविका तसेच सहकार अकाउंटन्सीमधील जनरल डिप्लोमादेखील प्राप्त केला आहे. एमपीएससीची परीक्षा उतीर्ण होऊन सरळ सेवेने वर्ग एकच्या विविध पदांवर काम केले आहे. यात नाशिक येथे पोलिस अधिकारी म्हणून, नांदेडच्या मुख्याधिकारी, मंत्रालयात वित्त विभागात कक्ष अधिकारी, साखर आयुक्तालयात सहायक संचालक, सिद्धार्थ सहकारी बॅंकेच्या अवसायक म्हणून देखील काम पाहिले आहे. साखर आयुक्तालयात असताना राज्यातील साखर कारखान्यांना अर्थसाह्य व अनुदान दिले. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दरवर्षी दहा कोटींचा निधी वितरित केला तसेच साखर कारखान्यांना रोड ग्रॅंड, विस्तारीकरण व सुधारणा यासाठी दोनशे कोटींपर्यंत अनुदान दिले. त्याच वेळी अवसायक म्हणून सिद्धार्थ बॅंकेचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे होता. सर्वसामान्य जनतेच्या बॅंकेतील ठेवीपोटी ३२ कोटींच्या ठेवी मंजूर करून त्याचे वाटप केले यानंतर अवसायक बदल झाला. मात्र बॅंक कर्मचारी, ठेवीदार यांनी मोर्चा काढल्याने पुन्हा माझी नियुक्ती करण्यात आली. मला माझ्या कामाची खरी पोच मिळाली. कर्मचाऱ्यांना अन्य नोकऱ्या, नुकसानभरपाई मिळवून देणे आदी कामेही केली. 

मंत्रालयात डेस्क ऑफिसर म्हणून काम करताना तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांना राज्याचे अर्थसंकल्प करणेकामी सहकार्य केले. विविध विभागांतील प्रकरणे हाताळली. शासन निर्णय काढले. तेराव्या फायनान्स कमिशनचे काम केले. वित्तीय सर्वेक्षण व एफआरबीएम ॲक्‍ट पुस्तक काढले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, आयपीएस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त डी. एन. जाधव यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट पोलिस अधिकारी म्हणून गौरव झाला. सहायक निबंधक म्हणून काम करताना भोर-वेल्हे-मुळशी भूषण, उत्कृष्ट सहकार अधिकारी म्हणून सन्मान झाला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. शेतकरी कर्जमाफीचे काम यशस्वीपणे पार पाडले. विकास सोसायटीच्या माध्यमातून उद्योग सुरू केले. सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडल्या. सावकारी धाडी टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 

जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी बांधवांसाठी ओतूर, आळेफाटा, बेल्हे, जुन्नर व नारायणगाव येथे मेळावे घेऊन किसन क्रेडिट कार्ड वाटपाचे नियोजन केले आहे. सहकार चळवळीची प्रगती होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात ७० ते ८० सहकारी संस्था नोंदणी केल्या आहेत. यात गृहनिर्माण सोसायटी, सहकारी पतसंस्थांचा व अभिनव संस्थांचा समावेश आहे. अटल महापणन अभियानाअंतर्गत विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना ८ ते १० उद्योग सुरू करून दिले. या कामगिरीबद्दल सहकारातील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

चला जाऊ गंगातीरी मालिकेत काम केले. कॉमेडी टेलिफिल्ममध्ये काम, आरती संग्रह काढला. रांगोळी, मेंदी, चित्रकला आवड, ड्रेस व इंटिरिअर डिझायनर, गोळा, भाला, थाळीफेक आवड, गायन, वादन व अभिनय आवड. सहकार विभागाच्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्काराने सन्मानित अशा अष्टपैलूंवर चमकणाऱ्या यशवंती मेश्राम यांची भावी स्वप्ने पूर्ण होतील यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Yashwanti Meshram on the occasion of womens day