पुणे - इयत्ता सहावीत असताना शाळेत ‘सकाळ’च्या वतीने ‘अधिकारी व्हायचे मला!’ अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तालुकास्तरावर मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. नाशिकचे तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारले आणि तेव्हापासूनच मनात आपणही ‘आयएएस’ अधिकारी व्हायचे, हे स्वप्नं मनात होतं.