हाथरस येथील घटनेनंतर पिंपरीमधील लोकप्रतिनिधी म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

-महिलांच्या सुरक्षिततेसाठी "सीसीटीव्ही' बसवा 

-सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविकांची मागणी; हाथरस घटनेचा निषेध 

पिंपरी : हाथरस येथील घटनेचा शहरात सर्व स्तरातून निषेध होत आहे. त्यानिमित्ताने शहरातील महिलांच्या सुरक्षेचा विषयही पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या संदर्भात ट्‌वीट केल्याने गेल्या दोन वर्षातील अत्याचाराच्या घटनांचा आलेख राजकीय पक्षांकडून मांडला जात आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. 
उत्तरप्रदेशातील हाथरस येथील घटना माणूसकीला काळिमा फासणारी आहे. तिच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने, निदर्शने केली आहेत. 
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ महिन्यांत 44 खून व 87 बलात्कार झाल्याचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले होते. हा संदर्भ घेऊन विरोधकांनी गेल्या वर्षीची आकडेवारी काढून वाघ यांच्या ट्विटला प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या वर्षी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी आठ महिन्यात 47 खून 121 बलात्काराच्या घटना घडल्याचा आरोप केला. अशा महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही करण्यात आला. 

लोकप्रतिनिधी म्हणाले... 
महापौर उषा ढोरे : शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. 
सीमा सावळे ः सरकार कोणाचेही असो. महिलांवर अत्याचार होत असतील, तर ही बाब चांगली नाही. 
संगीता ताम्हाणे : त्रिवेणीनगर परिसरातही महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत असल्योन कॅमेरे हवेत. 
आशा शेंडगे : कासारवाडीतही घटना घडली होती, महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
मंगला कदम : महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना करायला हवी. 
एकनाथ पवार : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत पोलिस आयुक्तांसोबत बैठक घ्यावी. 
नामदेव ढाके : अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. 
राहुल कलाटे : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
सचिन चिखले : पक्षीय राजकारण बाजूला ठेवून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Install CCTV for women's safety in pimpri city