दिव्यांगांच्या सांस्कृतिक स्पर्धांसाठी निधी उपलब्ध करून देऊ : रणजीत शिवतारे

inter district competition of handicapped students in Pune
inter district competition of handicapped students in Pune
Updated on

हडपसर (पुणे) : दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी चालू वर्षी प्रथमच राज्य शासनाच्या परवानगीने जिल्हा परिषदेने अनुदान दिले आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या सांस्कृतिक स्पर्धांसाठी यावर्षी निधी उपल्बध करून दिला जाईल, त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या अंध व कर्णबधीर प्रवर्गातील स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवतारे बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, वैद्यकीय समाजिक कार्यकर्त्या रोहिणी मोरे, बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे, सामाजिक कार्यकर्ते भाउसाहेब कांबळे, श्रीराम सिध्दपाठकी, संभाजी भांगरे, गणेश टिळेकर, पूर्वा जोशी, क्रीडाशिक्षक अशोक नांगरे, कैलास गायकवाड, अशोक जाधव, अभिजीत नांगरे, राजेंद्र सुतार, गिता ठकार आएषा शेख, संतोष पठारे उपस्थित होते.

कोरगंटीवार म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण दडलेले असतात, त्यांचा शोध घेवून ते विकसीत करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभाग उत्तम कार्य करत आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होत आहे. क्रीडा स्पर्धांबरोबरच दिव्यांगाच्या सांस्कृतिक स्पर्धांसाठी अनुदान मिळणार असल्याने प्रथमच जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा प्रथमच पुणे जिल्ह्यात होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com