पुण्यात भित्तिचित्रांतून शहर नागरिकांशी संवाद

प्रवीण डोके
शनिवार, 25 जानेवारी 2020

पुण्यातील वाढते प्रदूषण आणि व्यवसाय यामुळे आरोग्य आणि स्वच्छता हा आव्हानाचा भाग आहे. परंतु, स्वच्छ अभियानांतर्गत रेखाटलेली ही चित्रे पुण्याचे प्रदूषणविरहित वातावरण टिकवून ठेवण्यास मदत करतील.
- अमित देशपांडे, व्यवसायिक.

मार्केट यार्ड - आपले शहर नेहमीच आपल्याशी विविध माध्यमांतून संवाद साधत असते. मात्र, त्याकडे आपले लक्ष पाहिजे. शहराचा वारसा जपण्याच्या जाणिवेतून शहरात स्वच्छता राखण्याचाही संदेश मिळतो. ही बाब लक्षात घेऊनच विविध ठिकाणी भित्तिचित्रांतून शहर नागरिकांशी संवाद साधू लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर चकाचक ठेवायचंय... अर्थात! स्वच्छ अभियानात आपला सहभाग नोंदवायचा आहे. त्यासाठीची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आहे. स्वच्छ भारत अभियानात देशात अव्वल येण्यासाठी सुरू असलेली ही धडपड सजग पुणेकरांच्या सहभागीशिवाय पूर्ण होणे अशक्‍य आहे. त्यामुळेच ऐतिहासिक वास्तूंचा वारसा असलेली भित्तिचित्रे दिसू लागली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction with city citizens through murals in Pune