व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही गोळ्या झाडून दिली जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही गोळ्या झाडून दिली जीवे मारण्याची धमकी

पुणे - पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांकडून (Police) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) (Mokka) कारवाई (Crime) झालेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही व्यावसायिकासमोरच गोळ्या झाडून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याची व्यावसायिकाची अलिशान कारही जबरदस्तीने नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

नानासाहेब गायकवाड, दिपा नानासाहेब गायकलाड, राजु दादा अंकुश व त्यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळे निलख येथील 37 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2017 ते मार्च 2021 दरम्यान औंध व गायकवाड याच्या सुस येथील फार्महाऊसवर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्यावसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून चार टक्के व्याजाने 29 लाख रुपये घेतले होते. फिर्यादी ठरलेले व्याज गायकवाडच्या घरी जाऊन देत होते. असे असतानाही मुद्दल दिली नाही म्हणून त्यांनी फिर्यादीची मर्सिडीज बेंझ हि अलिशान गाडी तारण म्हणून नेली.

हेही वाचा: ‘अफगाणिस्तान’मुळे ड्राय फ्रूट आयातीला फटका

फिर्यादीने सहा महिन्यांनी मुद्दल दिली नाही, या कारणावरून त्यांना घरी बोलवून गाडीची कागदपत्रे, आवश्‍यक कोऱ्या टीटी फॉर्मवर व 25 लाखांच्या धनादेशावर सह्या घेतल्या. नंतर गाडी दिपा गायकवाड यांच्या नावावर करून घेतली. तसेच मार्च 2019 मध्ये त्यांनी फिर्यादीस त्यांच्या बंगल्यावर बोलवून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच नानासाहेब गायकवाड याने त्याच्याजवळील बंदुकीतुन तीन गोळ्या झाडून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादीने व्याज व मुद्दल असे 32 लाख रूपये त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे तारण ठेवलेली मर्सिडीज गाडी मागितली. तेव्हा त्यांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Web Title: Interest Money Firing Crime Warning Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimemoneyWarning