

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नगरसेवकांमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर आता एकाच प्रभागात निवडून आलेल्या अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात शहरातील नेत्यांकडे तक्रार केली तरी त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने हा वाद आणखी वाढत आहे.