- अविनाश घोलपफुलवडे - बालपणापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षांचा सामना करणाऱ्या सुरेश हुले यांनी आपल्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी अपंगतेला मात दिली आणि शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून नाव कमावले..बालपणापासून जन्मजात अस्थिव्यंगतेने ग्रासलेले नारोडी (ता. आंबेगाव) येथील सुरेश तुकाराम हुले (वय-५५) यांनी शिक्षणासाठी अपार संघर्ष केला. गावातील जिल्हा परिषद शाळेत जाण्यास सुरुवातीला भावाने खांद्यावर उचलून नेले, नंतर काठीचा आधार घेऊन स्वतः प्रयत्न केला..आईवडील व कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी शिक्षणात लक्ष केंद्रित केले. त्यांना विद्यालयीन, महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनेक गोड-कडू अनुभव आले. अनेक मदत करणारे मित्र जिवनात भेटले. शिक्षणक्षेत्रातील बीएड पदवी मिळविल्यानंतर रोजगार मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले. आर्थिक परिस्थितीला तोंड देत ‘कमवा व शिका’ योजनेतून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले..अधू पायावर होणाऱ्या उपचारांनंतरही जीवनातल्या मानसिक आणि शारीरिक ताणावर मात करत त्यांनी पदव्या प्राप्त केल्या. बीएड नंतर रोजगारासाठी अनेक परीक्षा दिल्या, अखेर आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिक्षक व नंतर मुख्याधापक म्हणून काम करत आहेत.शिक्षणाच्या जोरावर आर्थिक स्वावलंबन मिळविल्यानंतर, समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी सुरेश हुले नेहमीच पुढाकार घेतात. अंधश्रद्धा आणि निरक्षरतेविरुद्ध त्यांनी मोहीम राबवली. तांत्रिक साधनांचा वापर करत मोबाइल ॲप व वॉकरच्या साहाय्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवे प्रयोग केले आहेत..सुरेश हुले म्हणतात, ‘कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कष्ट करावेच लागतात. वाचन, मनन आणि चिंतन हे यशस्वी जीवनाचे मुख्य मंत्र आहेत.’ सुरेश हुले सांगतात की, ‘कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल वापर तर काबाड कष्ट करावेच लागतात. वाचन, मनन, चिंतन हे यशस्वी जीवनाचे सर्वस्व आहे.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.