पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का

Pune-University
Pune-University
Updated on

पुणे - आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. विविध विभागांमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तब्बल २९ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवेशात ४५ विद्यार्थ्यांची वाढ दिसत असली तरी ती चार वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमीच आहे. 

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या अहवालातील माहितीनुसार, २०१६ ते १९ या चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत २ हजार ८३७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. २०१६-१७ मध्ये विद्यापीठात ८५९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते. २०१९-२० मध्ये हीच संख्या घटून ६१० वर आली आहे. 

आफ्रिका खंड, मध्य-पूर्वेतील देश येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकण्यासाठी विद्यापीठात येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची घटलेली संख्या विद्यापीठासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com