Video : खेड-शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या ४८ जणांना तडीपारीच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

काहीही झाले तरी 16 फेब्रुवारीला खेड-शिवापूर टोल नाक्यावर 'टोल हटाव बेमुदत धरणे आंदोलन' करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. 

खेड-शिवापूर : पुणे-सातारा या महामार्गावर असलेला खेड-शिवापूर टोलनाका गेल्या काही वर्षांपासून वारंवार चर्चेत असतो. टोलनाका बंद करा, टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, छोटे-मोठे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या टू-व्हिलर, फोर व्हिलर चालकांचे या टोलनाक्याकडे बारकाईने लक्ष असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता हा खेड-शिवापूर टोलनाका हद्दपार करावा, याकरिता येत्या 16 तारखेला धरणे आंदोलनाची जोरदार तयारी चालू आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या 48 जणांना पोलीस प्रशासनाकडून तडीपारीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

- माओवादी कनेक्शन प्रकरण; पुढील सुनावणी आता...

14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत हद्दीत राहण्यास मनाई असल्याची नोटीस देण्यात आली आहे. मात्र, काही झाले तरी टोल हटाव आंदोलन होणारच अशी भूमिका टोल हटाव कृती समितीने घेतली आहे. आता आरपारची लढाई असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. 

- ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर तरुणाईच्या काय आहेत प्रतिक्रिया

दुसरीकडे टोल प्रशासन आंदोलन दडपण्याचे काम करीत आहे. जनतेला होत असलेला त्रास आता सहन होत नसल्याने काहीही झाले तरी 16 फेब्रुवारीला खेड-शिवापूर टोल नाक्यावर 'टोल हटाव बेमुदत धरणे आंदोलन' करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

- अरे बापरे! पीएमपीच्या उत्पन्नात किती कोटींची झाली तूट बघा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police issue cross over notice to Khed Shivapur Tolnaka removal committee