

पिंपरी, पुणे: डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि NIMA OBGY सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुश्रुती २०२५ – आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषद’ तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाली. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्या एकात्मिक दृष्टिकोनातून शल्य–वैद्यकीय विज्ञानात नवे दिशादर्शन करणारी ही परिषद देश–विदेशातील तज्ज्ञ, क्लिनिशियन, संशोधक, प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले.