
पुणे : ‘‘योग ही आपली परंपरा, संस्कृती आणि आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शरीर आणि मनाला पुनरुज्जीवित करणारे योग हे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारले आहे. शरीराबरोबरच मनाला योग्य दिशा आणि उपचार देणारी अशी योग ही रचना आहे. जगामध्ये योगासनांकडे उपचार पद्धती आणि आरोग्यदायी जीवनशैली म्हणून पाहिले जाते. भक्ती आणि योगाद्वारे आरोग्यदायी, स्वास्थ्यपूर्ण समाज निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.