आंतरशालेय नाट्यस्पर्धेत ३४ नाटिकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

‘सकाळ’ एनआयई उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धा मंगळवारपासून (ता. २८) ते गुरुवारपर्यंत (ता. ३०) सकाळी १० ते ६ या कालावधीत होणार आहेत. पिंपरी येथील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्‍स स्कूलच्या रजत भवन सभागृहात होतील.

‘सकाळ’ एनआयईतर्फे उपक्रम; पिंपरीसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांची नोंदणी
पिंपरी - ‘सकाळ’ एनआयई उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धा मंगळवारपासून (ता. २८) ते गुरुवारपर्यंत (ता. ३०) सकाळी १० ते ६ या कालावधीत होणार आहेत. पिंपरी येथील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्‍स स्कूलच्या रजत भवन सभागृहात होतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून, निसर्ग संकट, सोशल मीडिया व बदलती शिक्षणपद्धती या विषयांवर भाष्य करणाऱ्या ३४ नाटिका पुणे, पिंपरी- चिंचवड व जिल्ह्याच्या शाळांमधील विद्यार्थी सादर करतील. विभागनिहाय विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल. ‘सकाळ’ एनआयईकडून शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व अभिनय कौशल्याला वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी पिंपरी येथील एचए प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सादरीकरण - मंगळवार (ता. २८) 
पिंपरीतील शाळा व कंसात नाटिकेचे नाव 

शि. प्र. मंडळी मराठी माध्यम प्राथमिक शाळा (मंत्र दिला शिवरायांनी), कन्या विद्यालय - पिंपरी (हिरवा जागर एक झणझणीत अंजन), शि. प्र. मंडळी इंग्रजी माध्यम शाळा - निगडी (सोशल मीडिया बेन ऑर बून, चलो हवा आने दो पानी संघर्ष), मॉडर्न हायस्कूल - निगडी (सोन्याचा दिस, सायबर ॲडिक्‍शन), ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय - निगडी (श. श. शाळा, हशा हुशा) साने गुरुजी आदर्श प्राथमिक विद्यालय - थेरगाव) सोशल मीडिया), ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला (वेक अप बिफोर इटस टू लेट, मूकम्‌ करोती वाचालम्‌, पेडों की पंचायत), नवमहाराष्ट्र विद्यालय - पिंपरी (पाव्हणं सोशल सोसल का?), सिटी प्राइड स्कूल (वुईच कलर डू यू वॉन्ट), एचए हायस्कूल - पिंपरी (आणि पृथ्वी पुन्हा फुलली), विद्या विनय निकेतन - विशालनगर, पिंपरी (करावे तसे भरावे).

बुधवारी (ता. २९), गुरुवारी (ता. ३०) 
पुणे शहर व जिल्ह्यातील शाळा - आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी - कात्रज (बेएकेबे), अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स (साखळी, जल है तो कल है), मॉडर्न हायस्कूल (मुले) - शिवाजीनगर (शेवटी मैदान बोलू लागले), चंद्रकांत दरोडे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय - शिवाजीनगर (पर्यावरण हाच खरा नारायण, सोशल मीडियाचा वापर), भारतीय विद्याभवन सुलोचना नातू विद्या मंदिर - पुणे (प्राकृतिक विपदा), रेणुका स्वरूप विद्यालय - पुणे (आखिर कब तक), मॉडर्न हायस्कूल - गणेशखिंड, डॉ. जी. जी. शहा इंग्लिश मीडियम स्कूल, जनता विद्या मंदिर -घोडेगाव (ता. आंबेगाव) (व्हेन नेचर स्पिक्‍स), अनंतराव कुलकर्णी विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल-नारायणगाव (दोष कोणाचा?), एंजल हायस्कूल -उरुळीकांचन (आम्ही घडलो तुम्ही बी घडाना, सोशल मीडिया), विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदिर-पिंपळी (पृथ्वी का बुखार).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interschool drama competition